बिनधास्त बोला-साभा गाजवा

शब्दसह्याद्री फाऊंडेशन

हजारोंचा समोर बिनधास्त बोलण्याचा आत्मविश्वास देणारी अभिनव अभ्यास चळवळ

वक्तृत्व-नेतृत्व- व्यक्तिमत्व विकास यांचे प्रशिक्षण

आमच्याबद्दल

संस्थापक,मार्गदर्शक ॲड.साई महाशब्दे
(LLB, LLM)

ॲड. साई महाशब्दे यांनी शालेय-महाविद्यालयीन आयुष्यात हजारो वक्तृत्व-वादविवाद- कथाकथन स्पर्धा जिंकल्या. राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम, मुख्यमंत्री मनोहर जोशी, गृहमंत्री आर आर पाटील, संशोधक डॉ. विजय भाटकर, पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड उज्वल निकम, जागतिक कीर्तीचे सरपंच पोपट पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आले.

ॲड. साई महाशब्दे यांनी त्यांच्या अनुभवातून, अभ्यासातून वक्तृत्व-वादविवाद-संभाषण कौशल्य यांचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार केला. शब्दसह्याद्री फाउंडेशनने या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करत 2010 पासून हजारो वक्ते घडवले आणि वक्तृत्वाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी शब्दसह्याद्री ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरली. त्यात अनेक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, पत्रकार, नगरसेवक, आमदार, शासकीय अधिकारी यांनी प्रशिक्षण घेत हजारोंच्या समोर आत्मविश्वासाने बोलण्याचे धाडस प्राप्त केले.

अचिव्हमेंट

  • वक्तृत्वाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था म्हणून शब्दसह्याद्री फाउंडेशनने नामांकन प्राप्त केले आहे.
  • दहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी वक्तृत्वाचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले.
  • अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
  • प्रशिक्षण पूर्ण करणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी नेतृत्व करत आहेत.
Scroll to Top