शब्दसह्याद्री फाऊंडेशन
हजारोंच्या समोर बिनधास्त बोलण्याचा आत्मविश्वास देणारी अभिनव अभ्यास चळवळ
बिनधास्त बोला सभा जिंका
वक्तृत्व-नेतृत्व-व्यक्तिमत्व विकास यांचे प्रशिक्षण

तुम्ही विद्यार्थी आहात,
विद्यार्थी नेते आहात,
तुम्ही शिक्षक, प्राध्यापक आहात
तुम्ही शिक्षण संस्थेचे संचालक आहात
तुम्ही नगरसेवक आहात,
तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात
तुम्ही डॉक्टर आहात, वकील आहात
पण तुम्हाला भाषण करता येते का?
चार-चौघात तुम्ही बिनधास्त बोलू शकता का?
तुमच्या भावना तुम्ही सहज व्यक्त करु शकता का?
तुमच्या कल्पना, तुमचे विचार, तुमचे मत तुम्ही प्रभावीपणे समोरच्यास पटवून देऊ शकता का?
भाषण करण्याची वेळ येता क्षणी तुमच्या पोटात गोळा येतो का?
व्यासपीठावर उभा राहता क्षणी तुमचे हातपाय थरथर कापता का?
फक्त भाषण करता येत नाही म्हणून तुमच्या हातून महत्वाची संधी गेलेली आहे का?
असे काही असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
आम्ही तुम्हांला हजारोंच्या समोर बोलण्याचा आत्मविश्वास देऊ.
आज पर्यंत १० हजारांपेक्षा जास्त लोकांना आम्ही प्रभावीपणे संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तर आता
तुम्हीपण बोलू शकता ते ही प्रभावीपणे.
वक्तृत्व, सुत्रसंचालन, मुलाखत, संवादशास्त्र, नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास यांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण….
दहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतले वक्तृत्वाचे प्रशिक्षण
गेल्या पंधरा वर्षात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, व्यावसायिक, सरपंच, नगरसेवक, आमदार, सरकारी अधिकारी, यांनी शब्दसह्याद्री च्या माध्यमातून यशस्वीरित्या वक्तृत्वाचे प्रशिक्षण घेतले. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे..
शब्दसह्याद्री फाऊंडेशनचे व्हिजन
हजारोंच्या समोर बिनधास्त बोलण्याचा आत्मविश्वास देऊन प्रत्येक क्षेत्रात देशाचं नेतृत्व करणारी सुजाण पिढी घडवणे.
मनोगत

संस्थापक, ॲड. साई महाशब्दे
वक्ता हा दहा हजारात एखादाच सापडतो,
इतका हा दुर्लभ गुण आहे.
असे म्हणतात,
कारण सर्वांच्या अंगी सर्वगुण असतातच असं नाही.
एखाद्या शूर असेल,
एखाद्याकडे बुद्धी असेल परंतु प्रत्येकाच्या ठायी वक्तृत्व असेलच असे नाही.
हे जरी खरे असले तरी थोडासा अभ्यास,योग्य प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे तंत्र जर आपण आत्मसात केले तर कोणताही सामान्य व्यक्ती प्रभावी वक्ता होऊ शकतो.
बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की प्रभावी वक्तृत्व म्हणजे भाषणचं.
मला कुठे राजकारणात जायचं आहे किंवा मला कुठे भाषण करायचा प्रसंग येणार आहे असा अजिबात नाही,
आपल्याला रोजच्या जीवनात बोलावंच लागतं.
उदा. आपल्या सहकाऱ्यांबरोबर, साहेबांबरोबर, आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांबरोबर बोलावे लागते.
एखादा डॉक्टर निव्वळ आपल्या बोलण्याने पेशंटचा अर्धा आजार बरा करू शकतो, हे आपण अनुभवलेही असेल.
वक्तृत्व कोणीही जन्मजात घेऊन येत नसतं,ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे.हे सामर्थ्य आपणही आत्मसात करू शकतो.गरज आहे फक्त प्रयत्न करण्याची,तंत्र समजून घेण्याची आणि योग्य प्रशिक्षणाची.त्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.
शब्द शस्त्र आहेत...
शब्द अस्त्र आहेत...
शब्द वादळं आणतात...
शब्द माणसं पेटवतात...
आणि ते विझवण्याचे सामर्थ्य सुद्धा शब्दातच आहे.
शब्दांनीच झाली आजपर्यंतच्या प्रत्येक युद्धाची सुरुवात आणि शेवटही..
शब्दचं आहेत आजच्या युगात पृथ्वीच्या परिघाचा केंद्रबिंदू ठरवलं तर ते पृथ्वीस ही वेठीस धरू शकतात.
या शब्दांच्या सामर्थ्यावर आमचा अफाट विश्वास आहे.
ह्या शब्दाच्या माध्यमातून वक्तृवाची साधना करण्यासाठी शब्दसह्याद्री मध्ये आपले स्वागत आहे...!
'वक्ता दशहस्त्रेषु'
कोर्सची वैशिष्ट्ये




